रुपाली चाकणकरांना वाटत होतं, आपल्या डोक्यावर तटकरेंचा हात असेपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागू
सुषमा अंधारे आणि रुपाली चाकणकर: रुपाली चाकणकर यांनी आतातरी झोपेतून जागे व्हावे, शुद्धीव व्हावे. त्यांनी सत्तेचा सगळा अहंकार सोडला पाहिजे. आता तुम्ही जमिनीवर आला आहात, भविष्यात अजून अजून जमिनीवर येणार आहात, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर (रुपाली चाकणकर) यांना लक्ष्य केले. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. त्यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सहआरोपी करुन अटक केली पाहिजे. रुपाली चाकणकर या अशोक खरातकडून चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा भाग होत्या. त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्या शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra Politics news)
रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी माझी बदनामी करणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, बुंद से गयी वो हौदसे नही आती. रुपाली चाकणकर अजूनही याप्रकरणात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत. मी चुकीच्या तारखा सांगून फोटो दाखवल्याचे चाकणकर म्हणतात. त्यांनी आता त्यांची एकही पोस्ट डिलीड करु नये. माझ्याकडे जे फोटो आणि तारखा आल्या ते मी दाखवले. मी रुपाली चाकणकरांचा हाताचे बोट कापलेला फोटो 12 आणि 9 सप्टेंबरचा असल्याचे म्हटले होते. त्याच्या काही दिवस आधी सोमवती अमावस्या होती, एवढेच मी म्हटले होते. पण रुपाली चाकणकर सध्या दु:खी असल्याने सैरभैर झाल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 ते 600 कोटींची संपत्ती कमावली आहे. सुनील तटकरे यांच्यासारख्या प्रभुतींचा त्यांना आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचा अहंकार इतक्यात जाणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
Rupali Chakankar and Sunil Tatkare: चाकणकरांना वाटत होतं, तटकरेंचा हात डोक्यावर असेपर्यंत काही होणार नाही: सुषमा अंधारे
रुपाली चाकणकर यांच्या कथनी आणि करणीत फरक आहे. एकीकडे जाहीर कार्यक्रमात ‘मुलींच्या हातात पोथ्या-पुराणं नको, संविधान द्या’ म्हणायचं आणि वास्तवात कोणाचेतरी पाय धुवायचे. रिल्ससाठी नवऱ्याने तुमची पूजा करायची आणि वास्तवात तुम्ही मात्र लिंगपासाटाची पूजा करायची. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळे समोर आल्यामुळे रुपाली चाकणकर सध्या दुखावल्या गेल्या आहेत. त्यांना वाटत होतं की, अख्खा पक्ष तटकरे चालवतात. सुनील तटकरेंचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्या केसाला धक्का लागू शकत नाही. पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. यानंतरी रुपाली चाकणकर यांचे ‘गिरे तो भी टांग उपर’, अशाप्रकारचे वर्तन सुरु आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.