बालेंद्र शाह घेणार 27 मार्चला पंतप्रधानपदाची शपथ
नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह हे येत्या 27 मार्चला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथेआधी म्हणजेच 26 मार्चला खासदारांना शपथ दिली जाईल. 5 मार्चला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला 182 जागा जिंकण्यात यश आले आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने निवडणुकीच्या आधीच बालेंद्र शाह यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. नेपाळी काँग्रेसचे सभापती गगन कुमार थापा यांनी प्रतिनिधी सभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्यांनी उपसभापती विश्वप्रकाश शर्मा यांच्याकडे सोपवला होता.
Comments are closed.