Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

रुपाली चाकणकर यांनी आतातरी झोपेतून जागे व्हावे, शुद्धीव व्हावे. त्यांनी सत्तेचा सगळा अहंकार सोडला पाहिजे. आता तुम्ही जमिनीवर आला आहात, भविष्यात अजून अजून जमिनीवर येणार आहात, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. त्यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सहआरोपी करुन अटक केली पाहिजे. रुपाली चाकणकर या अशोक खरातकडून चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा भाग होत्या. त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्या शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी माझी बदनामी करणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, बुंद से गयी वो हौदसे नही आती. रुपाली चाकणकर अजूनही याप्रकरणात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत.  मी चुकीच्या तारखा सांगून फोटो दाखवल्याचे चाकणकर म्हणतात. त्यांनी आता त्यांची एकही पोस्ट डिलीड करु नये. माझ्याकडे जे फोटो आणि तारखा आल्या ते मी दाखवले. मी रुपाली चाकणकरांचा हाताचे बोट कापलेला फोटो 12 आणि 9 सप्टेंबरचा असल्याचे म्हटले होते. त्याच्या काही दिवस आधी सोमवती अमावस्या होती, एवढेच मी म्हटले होते. पण रुपाली चाकणकर सध्या दु:खी असल्याने सैरभैर झाल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 ते 600 कोटींची संपत्ती कमावली आहे. सुनील तटकरे यांच्यासारख्या प्रभुतींचा त्यांना आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचा अहंकार इतक्यात जाणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Comments are closed.