धोनीऐवजी सरफराजला संधी! इरफान पठानने निवडली CSKची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला मिळाली संधी

चेन्नई सुपर किंग्स (CSK) IPL 2026 मध्ये सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. लिलावात काही महत्त्वपूर्ण खेळाडूंची निवड केल्यानंतर, संघ आता मैदानावर आपली ताकद सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. संघाची धुरा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडच्या हाती असली, तरी संघाचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे अनुभवी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली सीएसकेने यापूर्वीच पाच आयपीएल विजेतेपदे मिळवली आहेत.
या हंगामात मैदानावर या अनुभवी दिग्गजाची भूमिका नेमकी कशी असेल, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. सीएसकेचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने चेन्नई सुपर किंग्ससाठी आपली संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या संघात त्याने धोनीला वगळले आहे, ज्यामुळे क्रिकेट विश्वात एक जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
इरफान पठाणच्या मते, सहाव्या क्रमांकासाठी सरफराज खान हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. त्याने स्पष्ट केले की, जर धोनी फलंदाजीची मोठी जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसेल, तर त्या क्रमांकावर सरफराजला संधी देणेच योग्य ठरेल. त्याच्या शब्दांत सांगायचे तर, “सहाव्या क्रमांकावर सरफराज खानचे स्थान निश्चित आहे.”
धोनीला संघातून वगळण्यामागील कारण स्पष्ट करताना इरफान म्हणाला की, धोनी प्रत्येक सामना खेळण्यास आणि दीर्घकाळ फलंदाजी करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असेल, तरच संघाला त्याच्या अनुभवाचा पूर्ण फायदा होऊ शकेल. त्याने पुढे नमूद केले की, केवळ दोन षटकांची छोटीशी कॅमिओ चाहत्यांना आनंद देत असली, तरी संघाला त्यातून फारसा ठोस फायदा होत नाही. जर धोनी मैदानावर उतरणार असेल, तर त्याने किमान चार षटके फलंदाजी करणे अत्यंत आवश्यक आहे.
इरफान पठाणने निवडलेली सीएसकेची प्लेइंग इलेव्हन- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेव्हिस, सरफराज खान, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकील होसेन, मॅट हेन्री, नूर अहमद आणि खलील अहमद (इम्पॅक्ट प्लेयर)
Comments are closed.