IPL 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वाढवले 6 संघांचे टेन्शन! CSK आणि SRH ला बसणार सर्वाधिक फटका

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामाची सुरुवात व्हायला आता फक्त एक आठवड्याचा वेळ उरला आहे, पण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 6 संघांचे टेन्शन वाढवले आहे. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाचे 8 खेळाडू दुखापत किंवा इतर कारणांमुळे एकतर स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांतून बाहेर राहतील किंवा संपूर्ण स्पर्धेत खेळणार नाहीत. या खेळाडूंमुळे चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान CSK आणि SRH या संघांना सोसावे लागू शकते.
खरं तर, चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू नॅथन एलिस आणि मॅथ्यू शॉर्ट दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल 2026 च्या हंगामातून बाहेर झाले आहेत. फ्रँचायझी या दोन्ही खेळाडूंना आपल्या प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वाचा भाग मानत होती, परंतु आता ते उपलब्ध नसतील. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins & jack callis) आणि जॅक एडवर्ड्स जखमी आहेत. कमिन्स सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे, तर एडवर्ड्स संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
याव्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्सचा मिचेल स्टार्क वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. राजस्थान रॉयल्सचा सॅम करन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर लखनऊ सुपर जायंट्सचा जोश इंग्लिश वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीच्या सामन्यात नसेल. तसेच, आरसीबीचा (RCB) जोश हेझलवूड देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
Comments are closed.