भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, पोलिसांनी तक्रारीनुसार काम केलं : शिवेंद्रराजे भोसले

सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला असताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. सातारा जिल्हा परिषद  अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर राजकारण तापलंय. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपने पूर्णपणे लोकशाही मार्गाने विजय मिळवल्याचा दावा केलाय. किडनॅपिंगचे आरोप फेटाळत, विरोधकांवर खोटं वातावरण तयार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टोला लगावला आहे.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, भाजपने ही निवडणूक पूर्णपणे लोकशाही मार्गाने लढवली. भाजपा आणि मित्रपक्षाचे 32 सदस्य एकत्र सभागृहात गेले, कोणताही दबाव किंवा हस्तक्षेप नव्हता. काही सदस्य समोरच्या पार्टीत होते त्यांनी देखील सभागृहात गेल्यानंरत पूर्ण विचाराने कोणाच्या दबावाखाली न येता भाजपला मतदान केले. आम्ही कोणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही.

किडनॅपिंगच्या आरोपांवर बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं की, त्या प्रकरणात भाजपचा कोणताही संबंध नाही. जिल्हा परिषद सदस्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली असून पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली आहे. पोलिसांनी योग्य वाटलं म्हणून कारवाई केली आहे.

आम्ही लोकशाहीचा खून केला हे साफ खोटं : शिवेंद्रराजे भोसले

“भाजप हरली की लोकशाही जिंकली आणि भाजप जिंकला की आम्ही दंडेलशाही केली” असा विरोधकांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढे सांगितलं की, भाजपचे 28 सदस्य आणि मित्रपक्षांच्या सदस्यांच्या पाठिंब्यामुळे एकूण 33 मते मिळाली आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडून आले. “ज्यांना स्वतःचे सदस्य सांभाळता आले नाहीत, ज्यांना ज्यांच्या सदस्यांवर विश्वास नव्हता ते म्हणतात आम्ही लोकशाहीचा खून केला हे साफ खोटं आरोप करता आहेत,” असा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.

दरम्यान, पोलिस कारवाईवरूनही त्यांनी  मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला. “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?” पोलिसांच्या कारवाईमध्ये लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी आडवा पडायला नको होतं असा सवाल करत त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.

पोलिसांना वागणूक व्यवस्थित देत नसल्याने पोलिसांनी मंत्री शंभूराजे यांच्यावर भडास काढली या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले.. पोलिसांना वागणूक काय दिली की चर्चा खरे असेल तर हा ज्वालामुखी कोणाच्यात होता हा आम्ही पेटवला का पालकमंत्र्यांच आणि पोलिसांचे प्रेम आम्हाला माहिती नाही याच्यामध्ये आम्ही कोठे ही नव्हतो.. एकंदरीत, साताऱ्यातील सत्तासंघर्ष आता अधिकच चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.