घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान
गृहकर्जाचे व्याजदर भारत नवी दिल्ली : सध्या देशभरात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. यामुळं देशातील महानगरांसह इतर शहरांमध्ये घरांची मागणी वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळं अनेकांना घर खरेदी करताना बँकांच्या गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. वेगवेगळ्या बँका ग्राहकांना वेगवेगळ्या व्याज दरावर कर्ज देतात. यामुळं घर खरेदीच्या खर्चात फरक पडू शकतो. जर, तुम्ही गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या बँकांच्या व्याज दरांची माहिती आवश्यक आहे.यामुळं कोणत्या बँका किती टक्के व्याज दरानं कर्ज देतात हे जाणून घेऊयात.
एक्सिस बँकेच्या गृहकर्जाचा व्याज दर
एक्सिस बँक त्यांच्या ग्राहकांना 8 टक्के व्याजदरावर गृहकर्ज देते. मात्र, हा व्याज दर सर्वांसाठी सारखा नसतो. गृहकर्जाजा व्याज दर कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि पात्रता हे घटक महत्त्वाचे ठरतात. त्यानुसार व्याज दर बदलतात.
HDFC बँकेचा व्याज दर
जर तुम्ही एचडीएफसी बँकेचं गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बँक 7.75 टक्क्यांपासून गृह कर्ज देते. मात्र, कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, पात्रतेच्या अटी यानुसार व्याज दरात बदल होतात. म्हणून कर्ज घेताना तुम्ही व्याज दरात बदल करण्याची मागणी करु शकता. काही बँकांकडून कर्जदारांना व्याजदरात सूट दिली जाते.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक त्यांच्या ग्राहकांना 7.70 टक्के व्याजदरापासून गृह कर्ज देण्यास सुरुवात करतात. ग्राहक त्यांच्या प्रोफाईलच्या आधारे या बँकेत गृहकर्जासाठी अर्ज करु शकतात.
आयसीआयसीआय बँक
ICICI Bank त्यांच्या ग्राहकांना 7.45 टक्के व्याज दरापासून कर्ज देण्यास सुरुवात करतात. मात्र,7.45 टक्के व्याज दरावर गृहकर्ज प्रत्येकाला मिळत नाही. काही अंतिम व्याज दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरसह इतर गोष्टींवर अवलंबून असतो.
बंधन बँकेचा व्याज
बंधन बँक त्यांच्या ग्राहकांना गृहकर्ज 8.41 टक्क्यांवर देते.
गृहकर्ज व्याज दर रेपो रेटवर अवलंबून
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट जाहीर केले जातात. आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट निश्चित केले जाता. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केल्यास गृहकर्जाचा व्याज दर कमी होतो. रेपो रेट वाढल्यास गृहकर्जाचा व्याज दर वाढतो. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी मध्ये रेपो रेट जाहीर केला तेव्हा त्यात कोणताही बदल केला नव्हता.
आणखी वाचा
Comments are closed.