लेख – सेनापती संताजी ऊर्फ सुजान सिंह जाधवराव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सेनापती संताजी उर्फ सुजान सिंह जाधवराव (मांडवे, सातारा) हे मराठा साम्राज्यातील एक शूरवीर योद्धे होते. ते सरसेनापती धनाजी जाधवराव यांचे सुपुत्र असून, त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. सातारा जिह्यातील मांडवे येथे त्यांची समाधी आहे. त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वातंत्र्यलढय़ात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या पराक्रमामुळे ते मराठा इतिहासात ‘सुजानसिंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

संताजी जाधव यांची समाधी मांडवे या त्यांच्या जन्मगावी आजही अस्तित्वात आहे. मांडवे गावाच्या पूर्वेस ही समाधी असून समाधीवर घुमट आहे, ज्याची पडझड झाली आहे. तसेच समाधीच्या चौथऱ्यावर शंकराची पिंड आहे. यामुळे हे शंकराचे मंदिर असल्याचा ग्रामस्थांचा समज आहे. सध्या समाधीची अवस्था चिंताजनक असून समाधीभोवती वेलीचे जाळे निर्माण झाले आहे.

Comments are closed.