Lip Balm: गुलाबी आणि मऊ ओठांसाठी तुपापासून बनवा लिप बाम
दररोज ओठांना लिपस्टिक लावल्याने ओठांचे नुकसान होते. त्यामुळे ओठ काळे आणि कोरडे होतात. अशावेळी तुम्ही तुपापासून बनवलेला एक नैसर्गिक लिप बाम वापरू शकता. कारण तूप केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असते. विशेषतः ओठ कोरडे पडल्यास तुपाचा वापर केल्याने ओठ मऊ आणि गुलाबी होतात. त्यासाठी तुम्ही मोजके घटक वापरून तुपापासून घरी लिप बाम बनवू शकता. यामुळे ओठांना खोलवर पोषण, हायड्रेशन मिळते. ( Homemade Lip Balm From Ghee )
तुपाचा लिप बाम असा करा तयार
तुपाचा लिप बाम तयार करण्यासाठी ४ मोठे चमचे तूप, २ मोठे चमचे खोबरेल तेल, १ मोठा चमचा मध किंवा कोरफडीचे जेल आणि सुगंधी तेलाचे काही थेंब (जसे की पेपरमिंट किंवा लॅव्हेंडर तेल) असे साहित्य लागते.
लिप बाम करण्यासाठी एका लहान पातेल्यात तूप आणि खोबरेल तेल एकत्र कोमट करा. ते थंड झाल्यावर त्यात मध किंवा कोरफडीचे जेल घाला. शेवटी तुमच्या आवडीचे सुगंधी तेल घालून चांगले मिसळा. हे मिश्रण एका लहान डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. तुमचा नैसर्गिक लिप बाम काही तासांत तयार होईल.

मात्र ओठांना हा लिप बाम लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. लिप बाम नेहमी स्वच्छ डब्यात आणि कोरड्या जागी ठेवा. शक्य असल्यास लिप बाम फ्रिजमध्ये ठेवावा. तुम्ही ते बनवताना काही थेट बीटरूटचा रसही मिसळू शकता. यामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येतो. हा घरगुती लिप बाम दिवसातून २-३ वेळा किंवा रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा.
हेही वाचा: Face Mask: फेस मास्क लावताना टाळा ‘या’ चुका; अन्यथा होऊ शकते अॅलर्जी
Comments are closed.