बीजिंग ते दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यान थेट विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. ‘एअर चायना’ ही विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी दिली. भारतातर्फे इंडिगो देखील आपली विमानसेवा पुन्हा सुरू करणार आहे. ही सेवा केवळ प्रवासाच्याच नव्हे, तर व्यापार, पर्यटन आणि विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. गेल्याच महिन्यात, शांघाय आणि चीनमधील दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात आली होती. सहा वर्षांनंतर या भारतीय आणि चिनी शहरांमधील ही पहिली थेट विमानसेवा होती. यानंतर, 1 फेब्रुवारी रोजी एअर इंडियाचे पहिले विमान शांघायच्या पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 230 प्रवाशांना घेऊन नवी दिल्लीत दाखल झाले होते.
Comments are closed.