‘होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा अन्यथा… ट्रम्प यांचा इराणला 48 तासांचा अल्टिमेटम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा कडक ‘अल्टिमेटम’ दिला आहे. तत्काळ ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पूर्णपणे खुली न केल्यास इराणचे वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की, “जर इराणने या क्षणापासून पुढील ४८ तासांच्या आत कोणत्याही अटीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिका त्यांच्या विविध वीज प्रकल्पांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करेल. याची सुरुवात सर्वात मोठ्या प्रकल्पापासून केली जाईल.”
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाचे सागरी मार्ग असून जगातील सुमारे २०% कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते. इराणने हा मार्ग रोखल्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
ट्रम्प यांच्या या धमकीला इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. “जर अमेरिकेने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर किंवा इंधनाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला, तर मध्यपूर्वेतील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ आणि ऊर्जा केंद्रे इराणच्या निशाण्यावर असतील,” असा इशारा इराणच्या सशस्त्र दलांनी दिला आहे.
Comments are closed.