अशोक खरातला झटका, आणखी तीन पीडित महिलांनी भोंदूबाबाच्या कुकर्मचा पाढा वाचला, एसआयटीकडून गोपनीय
अशोक खरात: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता तपासाला आणखी वेग आला आहे. आधीच गंभीर आरोपांना सामोरे जात असलेल्या खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली असून, तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. (Nashik Crime News)
सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे. विशेष तपास पथक (SIT) या महिलांचे जबाब अत्यंत संवेदनशीलतेने नोंदवत असून, या नव्या साक्षींमुळे खरातविरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरातने महिलांचे शोषण केल्याचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री
दरम्यान, या प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास सुरू झाला आहे. आयकर विभागानेही यात एन्ट्री घेतली असून, खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे. नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील गोळा केला जात असून, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी केली जाणार आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरात आणि कुटूंबियांच्या नावावर 52 सातबारा
तपासादरम्यान खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर जवळपास 52 सातबारा नोंदी असल्याची माहिती समोर आली आहे. काही सामायिक जमिनींमध्ये सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे असल्याचाही संशय तपासात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या व्यवहारांच्या ‘लिंकिंग’द्वारे मोठे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता आहे. याशिवाय, बँक व्यवहार, रोख रकमेची हालचाल, देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे व्यक्ती यांनाही तपासाच्या कक्षेत आणले जात आहे. ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचीही पडताळणी केली जाणार असल्याने, खरातच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशोक खरात प्रकरण : NEMK ने घेतली केस?
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला असून, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खरातवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. सुरुवातीला या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुढील तपासात ही संख्या वाढून सुमारे 100 व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. आता अशोक खरातच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे खरात विरोधात कारवाई करण्यासाठी एसआयटीला आणखी सबळ पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Who Is Ashok Kharat : कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.