पंजाबचे मंत्री लालजीत भुल्लर यांनी राजीनामा दिला आहे

अधिकाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपानंतर पदत्याग

वृत्तसंस्था/ चंदीगड

पंजाबमधील कॅबिनेट मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांनी शनिवारी राज्य मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. अमृतसरमध्ये स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भुल्लर यांना पायउतार होण्यास सांगितले होते. अधिकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, तरनतारन जिह्यातील आमदार असलेल्या भुल्लर यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री मान यांनी मुख्य सचिवांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले, असे ते म्हणाले.

Comments are closed.