रुपाली चाकणकरांनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना सुचवली 4 नावं
नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापदावरून हकालपट्टी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चार नावे सुचवली आहेत. हा निर्णय सर्वस्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना घ्यायचा असल्याचे म्हणत भाजपने यात हस्तक्षेप करू नये असा अप्रत्यक्ष टोलाही रोहित पवारांनी लगावला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे, असे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे.
वरील नावांचा विचार झाला तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल. हा निर्णय सर्वस्वी सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा, असेही रोहित पवार यांनी नमूद केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 21 मार्च 2026
Comments are closed.