चल निघ येथून… ईशानची विकेट घेताच झीशान अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात केलेल्या ‘त्या’ कृत्
SRH सराव सामना इशान किशन IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग 2026 पूर्वी सर्व संघांनी आपापली तयारी जोरात सुरू केली आहे. त्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) देखील मागे नाही. सराव सामन्यांच्या माध्यमातून संघ आपली रणनीती अंतिम करताना दिसत आहे. मात्र, नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीमुळे अद्याप संघात दाखल झालेला नाही आणि सुरुवातीचे काही सामने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या काळात संघाची धुरा डावखुरा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
ईशान किशन आणि झीशान अन्सारी यांच्यात नेमकं काय घडलं?
शनिवारी झालेल्या इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्यात एक रंजक प्रसंग पाहायला मिळाला. ईशान किशन आणि लेगस्पिनर झिशान अन्सारी यांच्यात थोडी बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सामन्यातील एका षटकात किशनने अन्सारीचा चांगला सामाचार घेतला आणि तब्बल 20 धावा वसूल केल्या. मात्र, अन्सारीनेही कमालीची पुनरागमन करत त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर किशनला बाद केले.
यानंतर अन्सारीने जल्लोष करत दिला. त्यावर किशन काही क्षण थांबला आणि दोघांमध्ये थोडी शाब्दिक चकमक झाली. मात्र, नंतर किशन हसतच पॅव्हेलियनकडे परतला. त्यामुळे हा प्रकार गंभीर वाद नसून खेळातील स्पर्धात्मकता आणि जोशाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले. चाहत्यांनीही लक्षात घेतले की शेवटी किशन हसतमुखाने परतला, त्यामुळे संघात कोणताही तणाव नसल्याचे दिसून आले.
🚨 SRH सराव सामन्यात मोठी लढत !🤯
SRH कर्णधार इशान किशनने लेगस्पिनर झीशानविरुद्ध एका षटकात 20 धावा दिल्या, पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झीशानने त्याला बाद केले. विकेट घेतल्यानंतर झीशानने इशान किशनकडे बोट दाखवले, ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. pic.twitter.com/W9eLDOVyVB
— भारतीय स्पोर्ट्स नेटवर्क (@IS_Netwrk29) 21 मार्च 2026
मागील हंगामात SRH ची निराशाजनक कामगिरी
सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल 2025 हंगाम खास नव्हता. 14 पैकी फक्त 6 सामने जिंकण्यात संघाला यश आले, तर 7 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत, ज्याचा परिणाम संघावर झाला. मात्र, संघासाठी हेनरिक क्लासेन एकटाच चांगल्या लयीत दिसला. त्याने 14 सामन्यांत 172 च्या स्ट्राइक रेटने 487 धावा करत संघाची बाजू सावरली. SRH आपल्या मोहिमेची सुरुवात 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे करणार आहे.
सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर स्मरण, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामेंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलील अरोरा, साकिब हुसेन, ओंकार तारमाले, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.