‘ऑपरेशन सर्चलाईट’ला नरसंहार घोषित करण्याची मागणी, अमेरिकन संसदेत मांडला प्रस्ताव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेन खासदार ग्रेग जॉन लँड्समॅन यांनी एका सभेत बंगाली हिंदूंसदर्भाात प्रतिनिधीगृहात महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. 1971 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) मध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन सर्चलाईट’ अंतर्गत बंगाली हिंदू आणि अल्पसंख्यांकांवर झालेल्या अत्याचारांना आता जागतिक स्तरावर ‘नरसंहार’ म्हणून  घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ओहायो डेमोक्रॅट पार्टीचे असलेले लँड्समॅन यांनी शुक्रवारी हा ठराव मांडला असून त्या काळातील हिंसाचाराची गंभीर जखल घेण्याची मागणी केली आहे. यानंतर हा प्रस्ताव परराष्ट्र व्यवहार समितीकडे पाठवण्यात आला आहे.

या प्रस्तावात प्रामुख्याने काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने पद्धतशीरपणे बंगाली हिंदू लोकांना आणि विचारवंतांना लक्ष्य केले होते. लाखो लोकांच्या हत्या, सामूहिक अत्याचार आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या विस्थापनामुळे ही इतिहासातील एक भयंकर घटना मानली जाते. अमेरिकेतील हिंदुस्थानी आणि बंगाली लोकांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असून, यामुळे पीडितांना अनेक दशकांनंतर न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

अमेरिकन खासदारांच्या मते, या क्रूरतेला ‘नरसंहार’ म्हणून घोषित केल्याने भविष्यात अशा घटना रोखण्यास मदत होईल. प्रस्तावामध्ये त्यावेळच्या अमेरिकन प्रशासनाच्या भूमिकेवरही चर्चा करण्यात आली असून, आता नैतिक जबाबदारी म्हणून या घटनेला योग्य नाव देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या पावलामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. इतिहासातील चुकांची कबुली दिल्याने सध्याच्या परिस्थितीत शांतता आणि मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत पाया तयार होईल, असे समर्थकांचे म्हणणे आहे. या प्रस्तावावर येणाऱ्या काळात अमेरिकन संसदेत सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Comments are closed.