Lotus Blouse Design : ‘लोटस पॅटर्न’ ब्लाउज डिझाईन्सने बदला तुमचा साडी लूक

लग्नसराई असो किंवा घरगुती समारंभ, साडी ही नेहमीच स्त्रियांची पहिली पसंती राहिली आहे. पण हल्लीच्या फॅशनमध्ये साडीपेक्षा तिच्या ब्लाऊजकडे जास्त लक्ष दिलं जातं. साधी साडीही योग्य ब्लाऊजमुळे उठून दिसू शकते. सध्या ‘लोटस पॅटर्न’ म्हणजेच कमळाच्या नक्षीचे ब्लाऊज डिझाईन्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत. कमळाचे फूल भारतीय संस्कृतीत शुभ आणि सुंदरतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये या नक्षीचा वापर केल्यास लूक अधिक आकर्षक आणि देखणा दिसतो. पारंपारिक आणि आधुनिक स्टाईलचा छान मेळ साधणारे हे डिझाईन्स प्रत्येक वयोगटातील महिलांची पसंती बनत आहेत.

लोटस पॅटर्नचे काही खास ब्लाऊज डिझाईन्स, जे तुमचा साडी लूक पूर्णपणे बदलू शकतात…

1. कटवर्क लोटस डिझाईन
या प्रकारात ब्लाऊजच्या मागील भागात कमळाच्या आकारात कटवर्क केले जाते. त्यामध्ये जाळी किंवा वेगळ्या रंगाचे कापड वापरले जाते. सिल्क किंवा पैठणी साड्यांसोबत हा डिझाईन खूप उठून दिसतो आणि लूकला ट्रेंडी टच देतो.

कटवर्क लोटस डिझाईन

2. जरी आणि धाग्याचे भरतकाम
ज्यांना पारंपारिक आणि भरगच्च डिझाईन आवडतात, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. कमळाच्या पाकळ्यांवर जरी किंवा रेशमी धाग्याने केलेले काम ब्लाऊजला श्रीमंती लूक देते.

जरी थ्रेड वर्क कमळ ब्लाउज डिझाइन
जरी आणि धाग्याचे भरतकाम

3. लटकन सह पॅचवर्क कमळ
ब्लाऊजच्या मागे कमळाचा पॅच लावून त्याखाली लटकन किंवा गोंडे दिल्यास डिझाईन अधिक आकर्षक दिसते. हा प्रकार तरुण मुलींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

लटकन सह पॅच वर्क कमल ब्लाउज
लटकन सह पॅचवर्क कमळ

4. ज्वेलरी स्टाईल लोटस डिझाईन
कमळाच्या नक्षीमध्ये मणी, कुंदन किंवा मोत्यांचे काम केले जाते. यामुळे ब्लाऊजला दागिन्यांसारखा लूक मिळतो आणि वेगळेपणा दिसतो.

ज्वेलरी स्टाइल लोटस ब्लाउज desgin
ज्वेलरी स्टाईल लोटस डिझाईन

5. सिम्पल पाईपिंग लोटस डिझाईन
साधेपणा आवडणाऱ्यांसाठी हा डिझाईन योग्य आहे. फक्त कमळाच्या आकाराची पाईपिंग किंवा हलकं हँड पेंटिंग करूनही ब्लाऊज खूप क्लासी दिसू शकतो.

साधे पाइपिंग कमळ डिझाइन ब्लाउज
सिम्पल पाईपिंग लोटस डिझाईन

6. एम्ब्रॉयडरी लोटस बॅक डिझाईन
ब्लाऊजच्या पाठीवर मोठ्या आकारात कमळाचे भरतकाम केल्यास तो पारंपारिक आणि आकर्षक दिसतो. लग्नसमारंभासाठी हा चांगला पर्याय ठरतो.

भरतकाम कमळ डिझाइन ब्लाउज
एम्ब्रॉयडरी लोटस बॅक डिझाईन

7. मिरर वर्क लोटस पॅटर्न
कमळाच्या डिझाईनमध्ये मिरर वर्क केल्यास ब्लाऊजला चमकदार आणि फेस्टिव्ह लूक मिळतो. विशेषतः रात्रीच्या कार्यक्रमांसाठी हा प्रकार योग्य आहे.

मिरर वर्क लोटस पॅटर्न
मिरर वर्क लोटस पॅटर्न

8. स्टोन वर्क लोटस डिझाईन
स्टोन आणि सीक्विन्सने केलेले कमळाचे डिझाईन ब्लाऊजला ग्लॅमरस बनवते. साखरपुडा किंवा रिसेप्शनसाठी हा पर्याय चांगला ठरतो.

स्टोन वर्क कमळ पॅटर्न ब्लाउज डिझाइन
स्टोन वर्क लोटस डिझाईन

9. डोरीसह लोटस बॅक
कमळाच्या डिझाईनसोबत मागे डोरी आणि लटकन दिल्यास ब्लाऊजला पारंपारिक आणि आकर्षक लूक मिळतो.

10. प्रिंटेड लोटस डिझाईन

मुद्रित कमळ वर्क ब्लाउज
प्रिंटेड लोटस डिझाईन

हलका आणि वापरायला सोपा पर्याय म्हणजे प्रिंटेड कमळ डिझाईन. दिवसा होणाऱ्या कार्यक्रमांसाठी हा कंफर्टेबल आणि स्टायलिश पर्याय आहे.

योग्य ब्लाऊज डिझाईन निवडल्यास साधी साडीही खास दिसू शकते. लोटस पॅटर्न हा सध्या ट्रेंडमध्ये असून, तो प्रत्येक लूकला वेगळा आणि सुंदर टच देतो.

Comments are closed.