कतारमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, अपघातात 6 जणांचा मृत्यू; एक बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नियमित मोहिमेदरम्यान कतारचे एक लष्करी हेलिकॉप्टर देशाच्या सागरी हद्दीत कोसळले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. कतारच्या गृह मंत्रालयाने अपघाताची पुष्टी केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.

कतारच्या गृह मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत अपघाताची माहिती दिली. नियमित कर्तव्यावर असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते देशाच्या सागरी हद्दीत कोसळले. संरक्षण मंत्रालयाकडून माहिती मिळाल्यानंतर, शोध आणि बचाव कार्यासाठी विशेष पथके घटनास्थळी दाखल झाल्याचे मंत्रालयाने नमूद केले.

Comments are closed.