Maharashtra Kesari Winners List: आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांची यादी

पुणे शहरातील वाघोली येथे पार पडलेला 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा महाअंतिम सामना रोमांचक ठरला. अखेरीस, हर्षवर्धन सदगीरने या प्रतिष्ठेच्या किताबावर 4-3 गुणांनी आपले नाव कोरले आणि ‘दुहेरी महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला.

ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या तर रामकृष्णा सातव पाटील यांच्या आयोजनाखाली पार पडली. 18 मार्च रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत, राज्यभरातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला. पारंपारिक मॅट गटातील अंतिम लढत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली.

या अंतिम सामन्यात, हर्षवर्धन सदगीरने ताकदाची अप्रतिम मेळ साधत महेंद्र गायकवाडचा पराभव केला आणि ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला.

या स्पर्धेच्या आतापर्यंत एकूण 68 स्पर्धा झाल्या असून नरसिंग यादव व विजय चौधरी हे दोन ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आहेत. स्पर्धेचे आजपर्यंतच्या सर्व विजेत्यांची यादी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते –

1961- औरंगाबाद- दिनकर डहारी
1962- धुळे- भगवान मोरे
1963- सातारा- स्पर्धा रद्द
1964- अमरावती- गणपत खेडकर
1965- नाशिक- गणपत खेडकर
1966- जळगाव- दिनानाथ सिंह
1967- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
1968- अहमदनगर- चंबा मुतनाल
1969- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार

1970- पुणे- दादू चौगुले
1971- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
1972- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
1973- अकोला- लक्ष्मण वडार
1974- ठाणे- युवराज पाटील
1975- चंद्रपूर- रघुनाथ पवार
1976- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
1977- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
1978- मुंबई- आप्पासाहेब कदम
1979- नाशिक- शिवाजीराव पाचपुते

1980- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
1981- नागपूर- बापू लोखंडे
1982- बीड- संभाजी पाटील
1983- पुणे- सरदार खुशाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
1985- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
1986- सोलापूर- गुलाब बर्डे
1987- नागपूर- तानाजी बनणे
1988- अहमदनगर- रावसाहेब मगर
1989- वर्धा- अनिर्णित

1990- कोल्हापूर- अनिर्णित
1991- अमरावती- अनिर्णित
1992- पुणे- आप्पालाल शेख
1993- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
1994- अकोला- संजय पाटील
1995- नाशिक- शिवाजी केकान
1996- स्पर्धा रद्द
1997- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
1998- नागपूर- गोरखनाथ सरक
1999- पुणे- धनाजी फडतरे

2000- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
2001- नांदेड- राहुल काळभोर
2002- जालना- मुन्नालाल शेख
2003- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
2004- वाशी- चंद्रहास निमगिरे
2005- इंदापूर, पुणे- सईद चाउस
2006- बारामती, पुणे- अमोल बुचडे
2007- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
2008- सांगली- चंद्रहार पाटील
2009- सांगवी, पुणे- विकी बनकर

2010- रोहा, रायगड- समाधान घोडके
2011- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
2012- गोंदिया- नरसिंग यादव
2013- भोसरी- नरसिंग यादव
2014- अहमदनगर- विजय चौधरी
2015- नागपूर- विजय चौधरी
2016- वारजे, पुणे- विजय चौधरी
2017-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
2018- जालना- बाला रफिक शेख
2019- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर

2020- स्पर्धा रद्द
2021- स्पर्धा रद्द
2022- कोथरुड, पुणे- शिवराज राक्षे (महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ) (14 जानेवारी 2022)
2022- सातारा- पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) (9 एप्रिल 2022)
2023- फुलगाव, पुणे- सिकंदर शेख (महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ) (10 नोव्हेंबर 2023)
2023- वर्धा- शिवराज राक्षे (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) (20 नोव्हेंबर 2023)
2024- स्पर्धा रद्द
2025- अहिल्यानगर- पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघ) (02 फेब्रुवारी 2025)
2025- कर्जत जामखेड, अहिल्यानगर- वेताळ शेळके (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद) (30 मार्च 2025)
2026- वाघोली, पुणे- हर्षवर्धन सदगीर. (महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ) (22 मार्च 2026)

Comments are closed.