उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांना आज निरोप, 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना पक्षप्रमुख, आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह निवृत्त होणाऱ्या 9 आमदारांना उद्या विधान परिषदेत निरोप देण्यात येणार आहे. येत्या 13 मे रोजी या नऊ आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपत आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील आमदार नीलम गोऱहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड तर भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि रमेश कराड यांचा निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये समावेश आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या नऊ आमदारांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपत असल्याने त्यांचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशन काळात उद्या त्यांना निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्याची मोर्चेबांधणी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे.

Comments are closed.