वाढवण बंदराविरोधात आज मंत्रालयावर धडक मोर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मच्छीमार, आदिवासी, शेतकरी, बागायतदार आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर गदा आणणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात उद्या सोमवारी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती करणार आहे. विविध मच्छीमार संघटना, आदिवासी संघटना आणि जनसंघटनाही या मोर्चात सहभागी होणार आहेत.

वाढवण बंदर प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भूमिपुत्रांनी उभारलेला लढा तीव्र करण्याकरिता हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भूमिपुत्रांना उद्या सकाळी 10 वाजता आझाद मैदान येथे मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील आणि सचिव वैभव वझे यांनी केले आहे.

काय आहेत मागण्या

वाढवण बंदर रद्द करण्याच्या मागणीबरोबर ससून डॉक येथील बंद गोदामे मच्छीमारांना देण्यात यावीत, कफ-परेड येथील ‘मरीना पार्क’ प्रकल्प रद्द करण्यात यावा, छत्रपती शिवाजी महाराज मार्पेट स्थलांतरित करण्याची प्रक्रिया थांबवावी आदी मागण्याही भूमिपुत्रांनी केल्या आहेत.

Comments are closed.