VIDEO: 2235 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे संजू सॅमसनला चॅलेंज, आयपीएलआधी क्रिकेटच्या मैदानावर नेमके काय घडले?

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम वेगळा असणार आहे, कारण संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सऐवजी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याला सीएसकेने आरआरकडून ट्रेड केले आहे. तसेच रविंद्र जडेजा राजस्थानकडून खेळताना दिसणार. त्यामुळे खेळाडूंबरोबर चाहतेही स्पर्धेची उत्साहाने प्रतिक्षा करत आहे. पिवळ्या जर्सीमध्ये पहिलाच सामना खेळण्याआधी संजूला २२३५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे आव्हान आहे.
संजूने त्या गोलंदाजाचा याआधी कधीही सामना केला नाही. त्यामुळे जेव्हा ते दोघे मैदानावर समोरा-समोर आले तेव्हा ते दृश्य थरारक होते. तो गोलंदाजी दुसरा कोणी नसून मुथय्या मुरलीधरन आहे.
चेन्नईच्या मैदानावर मुरलीधरन आणि संजू आमने-सामने आले. एका बाजूला नुकताच भारतासाठी टी२० विश्वचषक जिंकलेला खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपल्या संपूर्ण कारकिर्दीत २२३५ विकेट्स (१३७४ प्रथम श्रेणी, ६८२ लिस्ट ए, १७९ टी२०) घेणारा गोलंदाज.
संजूच्या हातात बॅट, मुरलीधरनच्या हातात चेंडू आणि विकेटकिपींगला एमएस धोनी. संजू त्याचा कसा सामना करतो याकडे लक्ष होते. त्याने पहिले दोन चेंडू सहज खेळले, मात्र पुढच्याच चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात मुरलीधरनने त्याला चकमा दिला. ते पाहून धोनीलाही हसू आले. शेवटी संजूने षटकार मारला. हे दृष्य पाहण्यासाठी चाहत्यांनी चेपॉक स्टेडियममध्ये मोठी गर्दी केली. जेव्हा संजूने तो षटकार मारला तेव्हा स्टेडियममध्ये अधिक आवाज झाला होता.
मुरलीधरन सीएसकेकडून खेळला आहे. त्याने २००८ ते २०१० हंगाम खेळला आहे. यादरम्यान त्याने सीएसकेसाठी ४० आयपीएल सामन्यांमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत. सध्या तो सीएसकेच्या रोअर २०२६ या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नईमध्ये आहे. तसेच सीएसकेच्या माजी खेळाडूंचा पुनर्मिलन सोहळाही पार पडला.
आयपीएल २०२६ मध्ये सीएसकेचा पहिला सामना ३० मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे.
Comments are closed.