तारक मेहता का उल्टा चश्मा; या सिरीयल मधील दया-सुंदरसह या कलाकारांची सुद्धा आहे खऱ्या आयुष्यातील नात्यांची अनोखी गोष्ट – Tezzbuzz
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये बॉलीवूड सिनेमा हे प्रसिद्ध आहेच, मात्र अशा अनेक मालिका होऊन गेल्या आणि काही सध्या सुरू आहे, ज्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात मालिकांच्या कथामधून स्थान मिळवले. ज्या मालिकानी बॉलिवूड सिनेमांनाही प्रसिद्धीबाबत मागील टाकून आपले वर्चस्व गाजवले. आशी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. या मालिकेने प्रसिद्धी मिळवलीच, त्यासोबत त्यातील अनेक कलाकार सुद्धा या मालिकेमुळे प्रसिद्ध झाले.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील कलाकारांची केमिस्ट्री एकमेकांसोबत उत्तमच आहे, मात्र याचे एक प्रमुख कारण सुद्धा आहे ते म्हणजे मालिकेतील अनेक कलाकारांचे खरा आयुष्यात एकमेकांशी रक्तांचे नाते आहे. या मालिकेत ‘दया भाभी’ आणि तिचा ‘वीरा’ सुंदरलाल यांची जोडी उत्तम आहेच. तर दयाची भूमिका साकारणारी दिशा (disha)वकानी आणि सुंदरलालची भूमिका साकारणारा मयूर वकानी हे खऱ्या आयुष्यात बहिण-भाऊ आहे. तसेच टप्पू आणि गोगी म्हणजेच टप्पूची भूमिका साकारणारा भाव्या गांधी आणि गोगीची भूमिका साकारणारा समय शाह हे खऱ्या आयुष्यात भाऊ आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील बाघा म्हणजेच अभिनेता तन्मय वेकारिया, त्याचे वडील अरविंद वेकारिया, हे देखील ‘तारक मेहता’च्या विश्वाचा एक भाग राहिले आहेत. अरविंद वेकारिया हे एक अनुभवी गुजराती नाट्य अभिनेते आहेत. त्यांची या मालिकेत छोटी भुमिका आहे मात्र अतिशय प्रभावी पात्र त्यांनी साकारले आहेत. ही वडील-मुलाची जोडी यामध्ये उत्तम काम करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या दीर्घकालीन यशाचे सर्वात मोठे रहस्य हे म्हणजे यातील कलाकार केवळ व्यावसायिक नाहीत, तर त्यांच्यात एक कौटुंबिक नातेही आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंदर 2ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, गदर चित्रपटालाही टाकले मागे
Comments are closed.