Skin Fasting : ग्लोइंग त्वचेसाठी ट्राय करा स्किन फास्टिंग

प्रत्येक स्त्रीला त्वचा सुंदर, ग्लोइंग आणि पिंपल फ्री असावी असे वाटते. यासाठी घरगुती उपायांसह बाजारातील महागडे ब्युटी प्रॉडक्ट वापरले जातात. पण तरी देखीला काही महिलांना त्वचेसंबंधित समस्या जाणवतात. सध्या तरूणाईंमध्ये त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी स्कीन फास्टिंग हा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याचजणी हा ट्रेंड फॉलो करत आहेत. पण, हे स्किन फास्टिंग नक्की काय आहे? ते कसे केले जाते? त्याचे फायदे काय आहेत? जाणून घेऊयात सविस्तरपणे

स्किन फास्टिंग म्हणजे काय?

स्किन फास्टिंग स्किनला डिटॉक्सिफाई करण्याचा आणि चमक देण्याचा एक मार्ग आहे. धावपळीचे रुटीन, अस्वास्थकर खाणं, केमिकल्सयुक्त कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर आणि प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने त्वचा निस्तेज होऊन विविध प्रकारच्या समस्या उद्भवणे हे हल्ली कॉमन झालं आहे. अशा परिस्थितीत त्वचेच्या समस्या कमी होऊन त्वचा चमकदार बनावी यासाठी स्किन फास्टिंग केलं जातं.  त्वचेला विश्रांती मिळावी यासाठी स्किन फास्टिंग केलं जातं.

कसे करावे?

स्किन फास्टिंगमध्ये स्किन केअर प्रोडक्ट्क्सचा वापर केला जात नाही. आठवड्यातून एक दिवस रोजचं रूटीन फॉलो केलं जातं नाही. तुम्ही स्किन फास्टिंग करण्यासाठी स्किन केअर प्रोडक्टक्स आणि मेकअप करणे बंद करू शकता, जसे की एक आठवडा किंवा तुम्ही रात्री तुमची त्वचा स्वच्छ करून स्किन फास्टिंग करू शकता. यामध्ये रात्री कोणतेही नाईट केअर प्रोडक्ट वापरू नयेत, दिवसा फक्त सनस्क्रीन वापरावी.

फायदे –

स्किन फास्टिंगमुळे त्वचेला नैसर्गिकरित्या ऑक्सिजन मिळतो. ज्यामुळे त्वचा टवटवीत दिसते.

आठवड्यातून किमान 2 दिवस स्किन फास्टिंग केल्याने त्वचेची पीएच लेव्हल मेंटेन होते. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात.

स्किन फास्टिंग केल्याने त्वचा पिंपल फ्री होण्यास मदत होते.

सतत मेकअप केल्याने आणि ब्युटी प्रॉडक्ट वापरल्याने त्वचेची नैसर्गिक छिद्र बंद होतात. पण जेव्हा तुम्ही स्किन फास्टिंग करता तेव्हा त्वचा आतून बरी होते.

हेही वाचा – Lotus Blouse Design : ‘लोटस पॅटर्न’ ब्लाउज डिझाईन्सने बदला तुमचा साडी लूक

Comments are closed.