अशोक खरातसोबत फोटो असलेल्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची विधानसभेत मागणी
भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे असून, त्याच्यासोबत ज्यांचे फोटो समोर आले आहेत, त्या सर्वांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नियम १०१ अन्वये तातडीने चर्चा करण्याची विनंतीही त्यांनी अध्यक्षांना केली.
विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “अशोक खरात या भोंदूबाबामुळे संपूर्ण राज्याची बदनामी झाली आहे. विधवा महिला, गरोदर महिला आणि लहान मुलींचे शोषण या भोंदूबाबाने केले आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
ते पुढे म्हणाले की, “अध्यक्ष महोदयांनी या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन नियम १०१ अंतर्गत तातडीने चर्चा घ्यावी. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे आणि ज्यांचे ज्यांचे या भोंदूबाबासोबत फोटो समोर आले आहेत, त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. म्हणूनच नियम १०१ अन्वये तातडीने चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा.”
Comments are closed.