आयपीएलपूर्वी SRH साठी गूड न्यूज! ‘हा’ 25 वर्षीय स्टार परदेशी खेळाडू पूर्णपणे फिट

आयपीएलच्या १९ व्या हंगामाची सुरुवात लवकरच होणार आहे. या हंगामातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. या सामन्यापूर्वी सनरायझर्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. फ्रँचायझीचा एक २५ वर्षीय स्टार खेळाडू या स्पर्धेत उतरण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज झाला आहे. कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत या खेळाडूचे तंदुरुस्त होणे संघासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, या खेळाडूला या हंगामात खेळण्यासाठी वैद्यकीय क्लिअरन्स (परवानगी) मिळाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षांचा तरुण श्रीलंकन वेगवान गोलंदाज इशान मलिंगा याला सनरायझर्सकडून खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. आतापर्यंत त्याच्या खेळण्यावर साशंकता होती, परंतु आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो टी-२० वर्ल्ड कपमध्येही श्रीलंकेसाठी खेळू शकला नव्हता. आता तो फिट होणे फ्रँचायझीसाठी मोठी बातमी आहे, कारण संघात परदेशी गोलंदाजांची कमतरता जाणवत होती.

​ईशान मलिंगा हा टी-२० क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे. त्याने आपल्या छोट्याशा टी-२० कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आहे. गेल्या वर्षीही त्याने सनरायझर्ससाठी खेळताना ७ सामन्यांत १३ बळी घेतले होते. त्याने आतापर्यंत आपल्या टी-२० कारकिर्दीत ३९ सामने खेळले असून, ८.५५ च्या इकॉनॉमी रेटने ५२ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. अशा परिस्थितीत, आता या हंगामात त्याची कामगिरी कशी राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments are closed.