IPL 2026: मुझरबानी पाठोपाठ दासुन शनाकाचाही ‘पीएसएल’ला रामराम; आता थेट या संघामध्ये एन्ट्री!

पाकिस्तान सुपर लीगला (PSL) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) आता राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला आहे. तो PSL 2026 मध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळणार होता, परंतु आता त्याने राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan royals) ताफ्यात अष्टपैलू खेळाडू सॅम करनची (Sam curren) जागा घेतली आहे.
राजस्थान रॉयल्सनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून दासुन शनाका IPL 2026 मध्ये गुलाबी जर्सीत खेळताना दिसेल. त्याने 2 कोटी रुपयांच्या करारासह राजस्थान संघात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या हंगामात पाकिस्तान सुपर लीग सोडून आयपीएलमध्ये येणारा शनाका हा पहिला खेळाडू नाही. यापूर्वी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानीने मुस्तफिजुर रहमानच्या जागी कोलकाता नाईट रायडर्समध्ये प्रवेश केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी स्पष्ट केले आहे की, जे खेळाडू पीएसएलचा करार मोडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये गेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. गेल्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशने मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केल्यामुळे पीसीबीने त्यांच्यावर पीएसएलमध्ये खेळण्यासाठी एका वर्षाची बंदी घातली होती.
दासुन शनाकाबद्दल सांगायचे तर, तो सध्या श्रीलंकेच्या टी-20 संघाचा कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 6 कसोटी, 71 वनडे आणि 131 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 3 हजारांहून अधिक धावा केल्या असून 86 विकेट्स घेतल्या आहेत. शनाका हा एक वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. यापूर्वी तो 2023 आणि 2025 मध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग होता. आतापर्यंत त्याने केवळ 3 आयपीएल सामने खेळले आहेत.
राजस्थान रॉयल्सचा अपडेटेड संघ:
रायन पराग (कर्ंधर), रवींद्र जडेजा, दासुन शनाका, डोनोव्हन फरेरा, संदीप शर्मा, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, लुआन-ड्रे प्रिटोरियस, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, युधवीर सिंग चरक, जोफ्रा आर्चर, क्वर्देना बेरफाडे, मासरे, तुस्सारे, मा. बिश्नोई, सुशांत मिश्रा, यशराज पुंजा, विघ्नेश पुथूर, रवी सिंग, अमन राव, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिलने, कुलदीप सेन.
Comments are closed.