कोलंबियातील लष्कराचे विमान कोसळले, 125 सैनिक होते विमानात, 80 सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती

बोगोटा, २३ मार्च. दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, 125 सैनिकांना घेऊन जाणारे लष्करी विमान पेरूच्या सीमेजवळ देशाच्या दक्षिण भागात कोसळले. लॉकहीड मार्टिन हर्क्युलस C-130 विमान पेरुव्हियन सीमेवर कोलंबियाच्या दक्षिणेकडील प्वेर्तो लेजिझामो येथून उड्डाण करत असताना ते क्रॅश झाले, असे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी सांगितले. विमान अपघातात सुमारे 80 जवानांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्था 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण पेरूच्या सीमेजवळ कोलंबियाच्या दक्षिणेकडील ॲमेझॉन क्षेत्राच्या अंतर्गत भागात आहे. विमानात सशस्त्र दलाचे जवान होते.
संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ म्हणाले, 'मी अत्यंत दु:खाने कळवत आहे की आमच्या कोलंबियन एरोस्पेस फोर्सच्या हर्क्युलस विमानाचा प्वेर्तो लेगुइझामो (पुटुमायो) येथून उड्डाण करताना एक दुःखद अपघात झाला. त्यावेळी विमानात आमच्या सार्वजनिक दलाचे सैनिक होते.
अपघातस्थळी आपत्कालीन आणि लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मंत्री किंवा अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांची संख्या किंवा अपघाताच्या कारणाला दुजोरा दिलेला नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'लष्करी तुकड्या आधीच घटनास्थळी हजर आहेत. मात्र, अपघातातील मृतांची संख्या आणि नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले, 'मला आशा आहे की या भीषण अपघातात कोणीही आपला जीव गमावला नाही. हा असा अपघात आहे जो कधीही होऊ नये.
Comments are closed.