न्यूझीलंड क्रिकेटमध्ये ‘टी-20’ क्रांती, लीग निर्णयानंतरच संचालकांच्या राजीनाम्याने संघटनेतील वाद चव्हाटय़ावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानासह क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेत न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या 21 वर्षे जुन्या ‘सुपर स्मॅश’ स्पर्धेला बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नव्या टी-20  फ्रेंचायझी लीगला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असली, तरी या निर्णयामुळे संघटनेत वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. हा फ्रेंचायझी लीगचा निर्णय होताच न्यूझीलंड क्रिकेटचे संचालक डियॉन नॅश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आले आहेत.

फ्रेंचायझी युगाची सुरुवात

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आपल्या सुपर स्मॅशला सहा संघांची खासगी मालकी असलेली टी-20 लीग करण्याचा निर्णय आज जाहीर केला. 2027 पासून ही लीग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, हा निर्णय व्यावसायिक, प्रशासकीय आणि संरचनात्मक करारांवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतरच अमलात येणार आहे.

स्त्री क्रिकेटवर विशिष्ट लक्ष

मंडळाच्या अध्यक्षा डायना पुकेतापु लिंडन यांनी नव्या लीगमध्ये महिला टी-20 स्पर्धेचा पूर्ण समावेश केला जाणार असून या लीगला  बळकटी देणे अत्यावश्यक आहे. महिला क्रिकेटचे महत्त्व कायम ठेवणे हीच आमची प्राथमिकता असल्याचेही त्या म्हणाल्या.

या लीगच्या मोठय़ा निर्णयानंतर लगेचच क्रिकेट संचालक डियॉन नॅश यांनी पदाचा राजीनामा देत खळबळ उडवली. संस्थेच्या भविष्यातील दिशेशी माझा मेळ बसत नसल्याचे सांगत त्यांनी अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे संघटनेत अंतर्गत वाद आणि मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे स्पर्धेचे भवितव्य कसे असेल, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Comments are closed.