इराणवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत मागे हटणार नाही, चर्चेचा दावा इराणने फेटाळला
इराणशी युद्ध विरामाबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा इराणने स्पष्ट शब्दांत फेटाळला. ‘ही फेक न्यूज आहे. अमेरिकेचा व त्यांच्या मित्र राष्ट्राचा कोसळत असलेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी आणि युद्धामुळे ओढवलेली नामुष्की लपवण्याचा हा प्रयत्न आहे,’ असे इराण सरकारने स्पष्ट केले. ‘अमेरिकेने काही देशांच्या माध्यमातून आम्हाला चर्चेसाठी विनंती केली होती. मात्र आम्ही ती मान्य केली नाही. आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही किंवा सुरू नाही,’ असे इराणी संसदेचे प्रवत्ते मोहम्मद गालिबफ म्हणाले. ‘आमच्या विरोधात युद्ध सुरू करून अमेरिका व इस्रायल ट्रपमध्ये अडकले आहेत. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधत आहेत,’ असे गालिबफ म्हणाले. ‘इराणवर हल्ला करणाऱयांना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमच्या जनतेची भावना आहे. हे ध्येय पूर्ण होईपर्यंत इराण मागे हटणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
Comments are closed.