अमेरिकेने नवीन क्षेपणास्त्राची चाचणी घेतली
युद्धादरम्यान सैन्यतयारीला वेग
अमेरिकेने तीव्र वेग अन् प्रगत तंत्रज्ञान असलेल्या नव्या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र सुपरसोनिक वेगाने हल्ला करण्यास सक्षम आहे. अमेरिकेच्या वायुदलाची रिसर्च लॅब आणि एका संरक्षण कंपनीने मिळून हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र जलद उत्पादन आणि तैनातीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र भविष्यातील युद्धांमध्ये किफायतशीर आणि प्रभावी शस्त्र ठरू शकते असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. याचदरम्यान पेंटागॉन इराणशी निगडित सैन्य अभियानासाठी अतिरिक्त निधी अन् सैनिकांची तैनात वाढविण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे.
Comments are closed.