धावांसाठी तरसले फलंदाज, खेळपट्टीवर फक्त एकाचीच दहशत! कोण होता तो गोलंदाज? ज्याने IPL मध्ये पहिल
IPL इतिहास पहिला सामना KKR vs RCB प्रवीण कुमार : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सुरुवात 28 मार्चपासून होणार असून हा स्पर्धेचा 19वा हंगाम आहे. आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेला होता आणि तो सामना चांगलाच गाजला होता. या सामन्यात केकेआरकडून खेळणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलमने (Brendon McCullum) त्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 73 चेंडूत 158 धावा ठोकल्या होत्या. आपल्या या विस्फोटक खेळीत त्याने 13 षटकार आणि 10 चौकार मारले. मॅक्युलमची ही खेळी आजही आयपीएल इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे.
आयपीएलच्या इतिहासात पहिले षटक टाकणारा गोलंदाज कोण? (Who bowled first ever over in IPL history?)
मॅककुलमची ही खेळी आयपीएलच्या इतिहासात कोरली गेली आहे, पण फार कमी क्रिकेट चाहत्यांना हे माहीत आहे की याच सामन्यात एका भारतीय वेगवान गोलंदाजाने एक अनोखा विक्रमही रचला होता. हा दुसरा कोणी नसून प्रवीण कुमार (Praveen Kumar) आहे, ज्याने एकदा चेंडूला आपल्या तालावर नाचवले होते. आयपीएलच्या इतिहासातील पहिले षटक टाकणारा गोलंदाज प्रवीण कुमार आहे. जरी प्रवीण कुमारने या षटकात तीन धावा दिल्या असल्या तरी, या सर्व तिन्ही धावा अतिरिक्त (extras) होत्या. म्हणजेच फलंदाजांना एकही धाव करता आली नव्हती.
केकेआरने सामना 140 धावांनी जिंकला (RCB VS KKR 1st IPL Match 2008)
आयपीएलच्या पहिल्या हंगामात केकेआरने आरसीबीविरुद्ध 140 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. मॅककुलमच्या शतकाच्या जोरावर, केकेआरने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात रिकी पाँटिंगने मॅककुलमसोबतच केकेआरसाठी 20 धावांची सर्वोच्च खेळीही केली.
केकेआरने दिलेल्या 223 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आरसीबी पूर्णपणे अपयशी ठरली. आरसीबीचा संपूर्ण संघ 15.1 षटकांत केवळ 82 धावांवर गारद झाला, ज्यामुळे केकेआरला 140 धावांनी विजय मिळाला. प्रवीण कुमार 18 धावांसह आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. प्रवीण कुमारच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 4 षटकांत 38 धावा दिल्या, पण IPL इतिहासातील पहिला ओव्हर टाकण्याचा मान मात्र त्याच्या नावावर कायमचा नोंदला गेला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.