श्रीलंका क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला टशन? IPL साठी एका कागदाने अडवली खेळाडूंची वाट, नेमकं चालले

श्रीलंका क्रिकेट NOC IPL 2026 : आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंच्या उपलब्धतेवरून नवा ड्रामा सुरु झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) अजून दिले नाही. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडून एनओसी घ्यावी लागते. मात्र, श्रीलंका बोर्डाने काही खेळाडूंची एनओसी थांबवली असल्याचं समजतंय. त्यामुळे या खेळाडूंच्या आयपीएल सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून बीसीसीआयला अप्रत्यक्ष टशन देत असल्याची चर्चा रंगली आहे.  स्टार वानिंदू हसरंगा आणि स्टार मथिशा पाथिराना यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता कायम असून, त्यामुळे त्यांच्या संघांसाठी चिंतेचे कारण बनले आहे.

हसरंगा आणि पाथिरानाच्या अडचणी वाढल्या (Sri Lanka Cricket NOC IPL 2026)

लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी बातमी तितकीशी चांगली नाही. वानिंदू हसरंगा आणि 18 कोटी रुपयांचा खेळाडू मथिशा पाथिराना हे सोमवारी झालेल्या फिटनेस चाचणीसाठी हजर झाले नाहीत. याचा अर्थ आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्यांचा सहभाग होण्याची शक्यता कमी आहे. केकेआर पाथिरानाच्या बरे होण्याची वाट पाहण्यास तयार आहे, तर एलएसजी अजूनही हसरंगाच्या प्रकृतीबद्दलच्या अधिकृत माहितीची वाट पाहत आहे.

नुवान तुषाराबाबत अनिश्चितता कायम आहे

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा वेगवान गोलंदाज नुवान थुशाराबाबतची परिस्थिती अस्पष्ट आहे. श्रीलंका क्रिकेटने यापूर्वी सांगितले होते की, थुशाराची ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) त्याच्या टेस्टच्या निकालावर अवलंबून असेल. सोमवार, 23 मार्चपर्यंत त्याच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, ज्यामुळे आरसीबीच्या गोटात काहीशी चिंता निर्माण झाली आहे.

इशान मलिंगा आणि कामिंदू मेंडिस हैदराबादसाठी रवाना

एसआरएचसाठी आनंदाची बातमी ही आहे की, 25 वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज इशान मलिंगा आणि 27 वर्षीय डावखुरा फलंदाज कामिंदू मेंडिस यांना बोर्डाने मंजुरी दिली आहे. हे दोन्ही खेळाडू मंगळवारी हैदराबादमध्ये दाखल होतील. याव्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्सचे दुशमंथा चमीरा आणि पथुम निस्संका, तसेच राजस्थान रॉयल्सचा नवीन खेळाडू दसुन शनाका यांनाही एनओसी मिळाली आहे.

हे ही वाचा –

IPL News : धावांसाठी तरसले फलंदाज, खेळपट्टीवर फक्त एकाचीच दहशत! कोण होता तो गोलंदाज? ज्याने IPL मध्ये पहिली ओव्हर टाकली

आणखी वाचा

Comments are closed.