मुरुड तापले, पारा @ ३६; पर्यटनावर परिणाम, रस्ते निर्मनुष्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुरुडमधील पारा ३६ अंशापर्यंत गेल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळी हवेतील गारवा सोडला तर दुपारच्या वेळेत उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तापमानात वाढ झाल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावल्याने त्याचा विपरित परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे.

समुद्रकिनारी असणाऱ्या मुरुड तालुक्यात सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहर आणि तालुक्यात पर्यटकांचा शुकशुकाट दिसत असून पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. मुरुड तालुक्याचे तापमान ३५ ते ३६ सेल्सिअसवर गेले आहे. पश्चिमे कडून समुद्रकिनारीदेखील गरम हवेच्या वाफा वाहत आहेत. समुद्रकिनारी भागातील हवेत मिठाचे प्रमाण असल्याने दमट हवामान नेहमी असते. कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी दुपारच्या रखरखीत उन्हात जाऊ नये, छत्री-टोपीचा वापर करावा, कामाशिवाय दुपारी बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

डांबरी रस्ते जबरदस्त तापून त्याचा गरम वाफेचा त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने शहाळी, कलिंगड, उसाचा रस, लिंबू सरबतांना मागणी वाढली. राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुरुडमध्ये अचानक तापमानात वाढ झाल्याने स्थानिक रहिवासीही हैराण झाले आहेत

Comments are closed.