Israel Iran War – इराणने अमेरिकेला जेरीस आणले; युद्धनौका यूएसएस फोर्डचे प्रंचड नुकसान
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध आता जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवस इराणच्या उर्जा केंद्रावर हल्ला करू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच इराणसोबत सकारात्मक वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, इराणने याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला असून युद्ध अधिक निकराने लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
ट्रम्प यांनी पाच दिवस उर्जा केंद्रावर हल्ला करू नये, असे निर्देश दिले. तसेच इराणशी सकारात्मक वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर इराणने ट्रम्प यांच्या दाव्याचा इन्कार करत, ट्रम्प यांचे विधान म्हणजे सैतानाचा पराभव असल्याचे म्हटले आहे. या युद्धात जगातील महासत्ता असलेल्या अमेरिका आणि इस्रायलला इराणने जेरीस आणले आहे. त्यामुळे या युद्धात इराणचे प्रंचड नुकसान झाले आहे. इराण उद्ध्वस्त झाले असले तरी त्याने अमेरिकेला जेरीस आणले आहे, हा इराणचा मोठा विजय असल्याचे मानले जाते.
इराणच्या ‘लॉन्ड्री फायर’नंतर ट्रम्प यांचे सुमारे १३,००,००,००० डॉलर्स किमतीचे युद्धजहाज यूएसएस फोर्डचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यूएसएस गेराल्ड आर. फोर्डला सक्रिय मोहिमांमधून माघार घ्यावी लागत आहे. आता हा अमेराका-इराण युद्धातील महत्त्वाच्या क्षणी यूएसएस गेराल्ड आर. फोर्डला माघार घ्यावी लागत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नौदल सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक महिने ही युद्धनौका तैनातीवर आहे. त्यावरील नौसैनिक त्रस्त असल्याने वृत्त आले होते. त्यांनी या दीर्घ तैनातीबाबत नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर आता जहाजावरील कथित नुकसान आणि प्रणालीवरील ताणामुळे या १३ अब्ज डॉलर्सच्या विमानवाहू जहाजाला दीर्घकाळ दुरुस्ती आणि देखभालीची गरज भासणार आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत संभाव्य चर्चेचे संकेत देत असताना, हा धक्का इराणच्या सततच्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या लष्करी क्षमतांवरील वाढता दबाव अधोरेखित करतो. तसेच अमेरिकेला जेरीस आणणे आणि त्यांच्या अद्यायावत आणि तंत्रज्ञानाने प्रगत असणाऱ्या यूएसएस गेराल्ड आर. फोर्डला माघार घेण्यास भाग पाडणे हा इराणचा मोठा विजय आहे.
Comments are closed.