IPL 2026: इशान मलिंगाला मिळाली श्रीलंका क्रिकेटची मंजुरी, ‘हे’ श्रीलंकन खेळाडू अजूनही होकराच्या प्रतिक्षेत

श्रीलंका क्रिकेट बोर्डनकडून इशान मलिंगाला आयपीएल २०२६ च्या हंगामात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र काही श्रीलंकन खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे. मलिंगाच्या येण्याने सनरायझर्स हैद्राबादची चिंता दूर झाली आहे. श्रीलंका क्रिकेटने मलिंगाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिला आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्याआधीच संघात सामील होणार आहे.
हैद्राबादमध्ये कामिंडू मेंडिस हा आणखी एक श्रीलंकेचा खेळाडू आहे. त्याला श्रीलंकेने आधीच आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दोघेही आता २८ मार्चच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळण्याच्या तयारीत आहेत. मलिंगा आणि मेंडिसला श्रीलंकेने परवानगी दिली मात्र नुवान तुषारा, वानिंदू हसरंगा आणि मथिशा पथिराणा यांच्याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.
हसरंगा (लखनऊ सुपर जायंट्स) आणि पथिराणा (कोलकाता नाईट रायडर्स) हे सोमवारी (२३ मार्च) झालेल्या फिटनेस चाचण्यांना मुकले आहेत, त्यामुळे ते ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास अनिवार्य ठरले आणि त्यामुळेच ते आयपीएलसाठी उशिरा संघात दाखल होतील.
पथिराणाला केकेआरने १८ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे, मात्र दुखापतीमुळे तो आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे कोलकाता बदली खेळाडूऐवजी त्याचे पूर्ण बरे होण्याची प्रतिक्षा करणार आहे.
हसरंगाला लखनऊ सुपर जायंट्सने २ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. त्याच्या मंजुरीबाबत श्रीलंका क्रिकेटकडून अधिकृत पत्राची प्रतिक्षा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज तुषाराबाबत तात्काळ कोणतीही माहिती उपलब्ध नाही. श्रीलंका क्रिकेटने नुकतेच एक निवेदन जारी केले आहे, त्यात म्हटले, “आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी नुवान तुषाराची ना हरकत प्रमाणपत्रासाठीची पात्रता त्याच्या शारीरिक कामगिरी चाचणीच्या निकालावर अवलंबून असेल.”
इतर श्रीलंकन खेळाडू दुश्मंथा चमीरा आणि पथुम निस्संका (दोघेही दिल्ली कॅपिटल्सचे) तसेच राजस्थान संघात नुकताच सामील झालेला दशून शनाका यांना मंजुरी मिळाली आहे.
Comments are closed.