‘क्रिमिनल जस्टिस’वर भारी ठरलेली हि सिरीज, 2 वर्षांपासून ट्रेंडिंग, तर आता येतोय नवा सीझन – Tezzbuzz

आजकाल Ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे Ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट सोबतच दक्षिणात्य चित्रपटांनी सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे. आणि तसेच अलीकडच्या काळात कोर्टरूम चित्रपट आणि मालिकांमध्ये लोकांची आवड वाढली आहे. Ott प्लॅटफॉर्म वर अनेक वेब सीरिज उपलब्ध आहेत. पण तुम्हाला जर कोर्टरूम, धडाकेबाज वेब सीरिज शोधत असाल तर ही वेब सीरिज नक्की पहा.

या मालिकेचे नाव ‘मामाला लीगल है’ आहे. जर तुम्ही ही मालिका अजून पाहिली नसेल, तर ती तुमच्या आवर्जून पाहा   या मालिकेचे कथानक केवळ दमदारच नाही, तर त्यातील प्रत्येक पात्र तुमच्या मनावर कायमचा ठसा उमटवेल. रवी (ravi)किशन आणि यशपाल चौधरी यांचा दमदार अभिनय तुमचे मन जिंकेल. तर व्ही. डी. त्यागी यांना बार असोसिएशनचे अध्यक्ष होण्याची आकांक्षा आहे. अनन्या श्रॉफने हार्वर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेल्या नैना ग्रेवाल या एका हुशार तरुण वकिलाची भूमिका साकारली आहे. ज्यांना कायदेशीर मदत मिळत नाही, त्यांना मदत करण्याची तिची इच्छा आहे. पण भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था पाहून तिला धक्का बसतो.

‘मामाला लीगल है’ हि मालिका 2024 मध्ये प्रदर्शित झाली. ही मालिका नेटफ्लिक्स यावर उपलब्ध आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, लोक ती पुन्हा पुन्हा पाहतात. आयएमडीबीवर या मालिकेला 8 रेटिंग मिळाले आहे. तर आता नेटफ्लिक्सने दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. नवीन सीझन 3 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

तारक मेहता का उल्टा चश्माचा अभिनेता रणवीर सिंग वर पडतोय भारी, धुरंदर 2 मध्ये ठरला गेम चेंजर

Comments are closed.