लैंगिक शोषणाचे आरोप झाले, नुकतेच लग्न केले; यश दयालने आता धक्कादायक निर्णय घेतला, नेमकं काय घडल

यश दयाल आयपीएल 2026 बाहेर : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चा थरार 28 मार्चपासून सुरू होणार असतानाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. ही माहिती RCB चे डायरेक्टर मो बोबाट यांनी दिली. याआधीच संघाला जोश हेजलवुड याच्या अनुपस्थितीचा फटका बसला होता, कारण तो सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नाही.

यश दयालबाबत मोठा अपडेट (Yash Dayal Will Not Play For Franchise In IPL 2026)

मो बोबाट यांनी सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे यश दयाल या हंगामात खेळू शकणार नाही. मात्र, त्याच्या जागी कोणाला संधी दिली जाणार याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरसीबी आता त्याचा योग्य पर्याय शोधणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या हंगामात यश दयालने दमदार कामगिरी करत 13 विकेट्स घेतल्या होत्या, त्यामुळे त्याची उणीव संघाला नक्कीच जाणवणार आहे.

टीम बसवरही दिसला नाही चेहरा

गेल्या काही दिवसांपासून यश दयालच्या अनुपस्थितीबाबत चर्चा सुरू होती. तो आरसीबीच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही सहभागी झाला नव्हता. त्यानंतर त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दरम्यान, आयपीएल 2026 साठी आरसीबीच्या टीम बसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात सर्व खेळाडूंचे फोटो दिसत होते, मात्र यश दयालचा फोटो नसल्याने चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.

पहिल्याच सामन्यात हैदराबादशी भिडणार (RCB VS SRH IPL 2026)

आयपीएल 2026 च्या उद्घाटन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. हा सामना 28 मार्च रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाईल.
डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून आरसीबी यंदा विजेतेपद कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

यश दयालवार गंभीर आरोप (यश दयाल IPL 2026 RCB)

उत्तर प्रदेशचा खेळाडू असलेल्या यश दयालवर दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. गाझियाबादमधील एका महिलेने त्याच्यावर लग्नाचे आश्वासन देत सुमारे 5 वर्षे शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला असून त्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय जयपूरमध्ये पॉक्सो कायद्यान्वये अल्पवयीन मुलीशी संबंधित आणखी एक गंभीर प्रकरण नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयने त्याला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. या सर्व वादांनंतरही त्याची क्रिकेट कारकीर्द सुरू राहिली आणि आयपीएल 2025 मधील आरसीबीच्या विजयानंतर त्याला 2026 साठीही कायम ठेवण्यात आले.

हे ही वाचा –

IPL 2026 Tickets Booking : आता IPL चा धमाका! स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी कसे करायचे Online तिकीट बुकिंग? जाणून घ्या A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.