सामान्य नागरिकांनी पोलिसांना शिस्त पाळायला सांगणे हा गुन्हा आहे का? अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

​छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल जे.पी इंटरनॅशनल या हॉटेलचे मालक प्रीतेश जैस्वाल यांनी PSI राहुल शिंदे यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देत शिवीगाळ केली तसेच आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत त्यांनी ​छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत त्यात जैस्वाल यांच्याबाबत घडलेला प्रकार सांगितला आहे. तसेच ”हे कायद्याचे रक्षक आहेत की गुर्मी आहे? सामान्य नागरिकांनी पोलिसांना शिस्त पाळायला सांगणे हा गुन्हा आहे का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

‘कायद्याचे रक्षक की वर्दीची गुर्मी? ​छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल व्यावसायिक प्रीतेश जैस्वाल यांनी मांडलेली व्यथा धक्कादायक आहे. हॉटेलबाहेर चुकीच्या पद्धतीने लावलेली गाडी नीट पार्क करायला सांगितली, म्हणून पीएसआय राहुल शिंदे यांनी रागाच्या भरात स्वतःहून गाडीची चावी दिली आणि नंतर चक्क ‘सरकारी कामात अडथळा’ आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला? इतकेच नाही, तर रात्री ५-६ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेलवर जात भरचौकात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत ‘तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो, तुझ्याकडे किती दम आहे बघतो’ अशी धमकी देणे, हा पोलीस खात्याचा कोणता शिष्टाचार आहे? ​जर सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर दूध का दूध… होईल. सामान्य नागरिकांनी शिस्त पाळायला सांगणे हा गुन्हा आहे का? पोलीस आयुक्त साहेब, आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे, हे ध्यानी घ्या”, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.

काय आहे प्रकरण ?

प्रीतेश उर्फ बंटी जैस्वाल यांचे नारळीबाग येथे हॉटेल जे.पी इंटरनॅशनल नावाने हॉटेल आहे, दि. २२/०३/२०२६ रोजी दुपारी १२:४१ च्या सुमारास, शहर चौक पोलीस स्टेशनचे पो.उप.नि. राहुल विलास शिंदे हे त्यांच्या खाजगी दुचाकीने (क्र. MH21CK4791) नारळीबाग येथे आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी चुकीच्या पद्धतीने पार्क केली होती. त्यावेळी सिक्युरिटी गार्डने त्यांना गाडी नीट लावण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्या नंतर मी स्वतः तिथे जाऊन त्यांना विनंती केली असता, त्यांनी उद्धटपणे “ही घे गाडीची चावी, मला काय करायचे ते मी बघतो असे सांगत त्यांनी प्रीतेश जैस्वाल यांच्याकडे चावी देऊन ते तिथून निघून गेले. त्यानंतर रात्री 9 वाजता शिंदे व इतर ५ पोलीस कर्मचारी हॉटेलवर आले. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जैस्वाल यांना शिवीगाळ केली व त्यांना ‘तुझी धिंड काढणार, तुझ्यात किती दम आहे बघतो, तुला कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवणार’, अशा धमक्या दिल्या. त्यानंतर राहुल शिंदे यांनी दाखल केलेल्या एफ.आय.आर. मध्ये (कलम १३२, ३५२ बी.एन.एस.) जैस्वाल यांनी त्यांचा शासकीय कामात अडथळा आणला किंवा तसेच चावी हिसकावून घेतली, असे आरोप केले आहेत.

Comments are closed.