हल्ल्यांचा परिणाम होणार नाही, आम्ही आमचे पॉवर प्लांट त्वरित पुन्हा उभे करू; वीज प्रकल्पाबाबात इराणचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या ऊर्जा क्षेत्राबाबत मोठा दावा केला आहे. “शत्रू राष्ट्रांच्या कोणत्याही संभाव्य हल्ल्यामुळे आमच्या वीज प्रकल्पांचे नुकसान झाले, तरी आम्ही आमच्या देशांतर्गत क्षमतेच्या जोरावर ते अत्यंत वेगाने पुन्हा उभारू शकतो,” असा दावा इराणचे ऊर्जामंत्री अब्बास अलीबादी यांनी केला आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांशी बोलताना अलीबादी यांनी म्हटले आहे की, इराणची वीज व्यवस्था ही विकेंद्रित स्वरूपाची आहे. संपूर्ण देशात १५० हून अधिक वीज प्रकल्प पसरलेले असून, ते एका विशिष्ट केंद्रावर अवलंबून नाहीत. या रचनेमुळे एखाद्या भागातील प्रकल्पावर हल्ला झाला तरी संपूर्ण देशाची वीज व्यवस्था कोलमडणार नाही. उलट स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साधनांनी ती यंत्रणा त्वरित पूर्ववत केली जाऊ शकते.

ते म्हणाले की, वीज प्रकल्पांसाठी लागणारी बहुतांश उपकरणे, विशेषतः क्लिष्ट समजले जाणारे टर्बाइनचे सुटे भाग आता इराणमध्येच तयार केले जातात. त्यांनी इतर खाडी देशांच्या ऊर्जा व्यवस्थेवर टीका करताना म्हटले की, “अनेक देशांचे वीज प्रकल्प अमेरिकन कंपन्यांनी उभारले आहेत, त्यामुळे बिघाड झाल्यास त्यांना पुन्हा त्याच कंपन्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. इराणने मात्र हे अवलंबित्व संपवले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आम्हाला परकीय मदतीची गरज भासणार नाही.”

Comments are closed.