Ashok Kharat News – भोंदू बाबा अशोक खरात असलेल्या पोलीस वाहनावर हल्ला, पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात
महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या भोंदू बाबा अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आजची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अशोक खरातला न्यायालयाबाहेर आणल्यानंतर तो असलेल्या पोलीस वाहनावर एका व्यक्तीने हल्ला केला. यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा अशोक खरातला आज सुनावणीसाठी नाशिक येथील न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने लोकांनाही न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. यातीलच एका व्यक्तीने तो असलेल्या पोलीस वाहनावर हल्ला केला. यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Comments are closed.