IPL 2026: सीएसकेला मिळाली नाथन एलिसची रिप्लेसमेंट; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ घातक गोलंदाजाची संघात एन्ट्री!

आयपीएलच्या नवीन हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai super kings) टीमला दुखापतग्रस्त खेळाडूंचा मोठा फटका बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज नाथन एलिस (Nathan Ellis) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत सीएसकेच्या टीमने आता एलिसच्या जागी दुसऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला संघात सामील करून घेतले आहे. हा वेगवान गोलंदाज 6 फूट 4 इंच उंचीचा असून त्याने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा 30 वर्षांचा घातक वेगवान गोलंदाज स्पेंसर जॉनसन (Spensor jonson) चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला आहे. फ्रँचायझीने त्याला 1.5 कोटी रुपयांना साइन केले असून आयपीएलकडूनही याला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. नाथन एलिसच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी टीम कोणत्या गोलंदाजाला संधी देणार, असा प्रश्न सतत विचारला जात होता.

आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये स्पेंसर जॉनसनचा समावेश होता, पण त्याला कोणत्याही टीमने खरेदी केले नव्हते. मात्र, एलिसच्या दुखापतीमुळे त्याचे नशीब चमकले आणि आता तो चेन्नईच्या टीमचा भाग बनला आहे. आयपीएलमध्ये सीएसके ही जॉनसनसाठी तिसरी फ्रँचायझी असेल. यापूर्वी 2025 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स तर 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांत 5 विकेट्स घेतल्या आहेत, पण यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा जास्त राहिला आहे.

स्पेंसर जॉनसनने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 5 वनडे आणि 8 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. या दरम्यान त्याने 18 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 8.96 राहिला आहे. यावेळी चेन्नईकडून खेळताना स्वतःला सिद्ध करण्याची त्याच्याकडे मोठी संधी असेल.

Comments are closed.