Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

मराठी Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र विधान परिषदेत असा एक क्षण आला की त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच साहेब असा उल्लेख केला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील आमदार म्हणून हे शेवटचे अधिवेशन आहे. त्या निमित्ताने निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेतील नऊ सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. मात्र, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव आल्यानंतर सर्वाचे कानही एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लागलं. उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा.

Comments are closed.