साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 जखमी
सातारा: राज्यातील अपघाताच्या घटना कमी होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असताता. मात्र, गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघाताच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यातच, सातारा (Satara) जिल्ह्यात आता अपघाताची (Accident) घटना घडली असून अक पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात 1 महिला ठार झाली असून 9 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं.
जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात असलेल्या निवकणे येथे जानाई देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची पिकअप गाडी जळव घाटात पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन भाविक गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचाराकरिता सातारा येथे तर उर्वरित जखमीना तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. जळव व आसपासच्या स्थानिक ग्रामस्थांनी वेगाने हालचाल करीत जखमींना तातडीने रुग्णालयात नेले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य सुरू केले आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.
निवकणे गावात जानाई देवीची यात्रा
जानाईदेवी नागरिकांचे व भाविकांचे जागृत श्रद्धास्थान आहे. देवीचे मूळस्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर दरीमध्ये असणाऱ्या निवकणे येथील आहे. दरवर्षी, महाशिवरात्रीनंतर जेजुरीतून जानाईदेवीचा पालखी सोहळा निवकणे येथे मार्गस्थ होतो. तेथेच देवीची यात्रा साजरी केली जाते. आता या यात्रेप्रमाणेच जेजुरीतही देवीची यात्रा भरविण्यात येणार आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.