IPL 2026: गतविजेत्या चॅम्पियन आरसीबीला मिळाले नवे मालक! बिर्लांसह या 4 कंपन्यांची मिळून खरेदी

आयपीएल 2025 स्पर्धेची चॅम्पियन टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 19 वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नवीन मालक मिळाले आहेत. फ्रँचायझी नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वीच विकली गेली आहे. आरसीबी संघाला 4 कंपन्यांनी मिळून खरेदी केले आहे. ज्यामध्ये आदित्य बिर्ला ग्रुप (एबीजी), टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप (टीओआई), बोल्ट व्हेंचर्स (बोल्ट) आणि ब्लॅकस्टोनची परपेचुअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी (बीएक्सपीई, ब्लॅकस्टोन) या नावांचा समावेश आहे. आरसीबीला आतापर्यंतची सर्वात मोठी डील मिळाली आहे.

रिपोर्टनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला (Royal Challengers Bangaluru) आदित्य बिर्ला ग्रुप (एबीजी), टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप (टीओआई), बोल्ट व्हेंचर्स (बोल्ट) आणि ब्लॅकस्टोनची परपेचुअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी (बीएक्सपीई, ब्लॅकस्टोन) यांनी मिळून खरेदी केले आहे. त्यांनी या फ्रँचायझीची किंमत 16,706 कोटी रुपये लावली आहे. त्यांनी यूके-डियाजिओ पीएलसीची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (यूएसएल) कडून 100 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. या डीलमध्ये आरसीबीचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ सामील आहेत.

आरसीबीची टीम आयपीएल 2008 च्या वेळी 446 कोटी रुपयांना विकली गेली होती. तर आज त्यांची किंमत वाढून 16,706 कोटी रुपये झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे डायरेक्टर आर्यमन विक्रम बिर्ला या टीमचे चेअरमन असतील. तर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सत्यन गजवानी व्हाईस चेअरमनच्या भूमिकेत असतील. या ग्रुपमध्ये बोल्ट व्हेंचर्सचे डेव्हिड ब्लिट्झर आणि बीएक्सपीईचे सीईओ विरल पटेल हे देखील असतील. हे सर्वजण मिळून आरसीबीशी संबंधित निर्णय घेतील.

जरी ही डील झाली असली, तरी आयपीएल 2026 मध्ये सध्याचे मालकच टीम चालवणार आहेत. आयपीएल 2026 संपल्यानंतर आर्यमन बिर्ला या फ्रँचायझीची जबाबदारी सांभाळतील. टीमचे चेअरमन बनल्यानंतर आर्यमन बिर्ला यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, ‘आमच्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही या पार्टनरशिपच्या माध्यमातून आरसीबी टीमला पुढील टप्प्यावर नेऊ. आम्ही मैदानावर ‘बोल्ड’ स्टाईलमध्येच खेळत राहू. तसेच चाहतेच आरसीबीला खास बनवतात. असेही त्यांनी नमूद केले.

Comments are closed.