उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याची तयारी सुरू, कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे बुकिंग ‘फुल्ल’; हजारो प्रवासी जादा गाड्यांच्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शाळकरी मुलांच्या परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचे प्लॅनिंग मुंबईकरांनी केले आहे. त्यासाठी कोकण रेल्वेच्या प्रवासाला पहिली पसंती दिली जात असल्यामुळे नियमित रेल्वे गाडय़ांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. कोकणकन्या एक्सप्रेससह सर्व प्रमुख एक्सप्रेस गाडय़ांचे बुकिंग ‘रिग्रेट’ दाखवले जात आहे. त्यामुळे वेटिंग तिकीटही मिळेनासे झाल्याने हजारो प्रवाशांना जादा गाडय़ांच्या प्रतीक्षेत राहावे लागले आहे.

मागील काही वर्षांपासून उन्हाळी सुट्टीतील बुकिंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदाही तीच स्थिती आहे. 15 एप्रिलनंतर शाळांना उन्हाळी सुट्टी असल्यामुळे 16 एप्रिलपासून मे महिन्यातील नियमित रेल्वे गाडय़ांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावणाऱया कोकणकन्या, मांडवी व जनशताब्दी एक्सप्रेस आणि दादर येथून सुटणारी तुतारी एक्सप्रेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा गाडय़ांच्या बुकिंगची प्रतीक्षा आहे.

आरक्षण आवाक्याबाहेर

कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ांचे आरक्षण मिळणे सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. गणेशोत्सव काळात आरक्षणाची जी स्थिती असते तशीच स्थिती सध्या आहे. एप्रिल-मे महिन्याच्या नियमित गाडय़ांच्या बऱयाच तारखांचे बुकिंग ‘रिग्रेट’ दाखवत आहे. मंगळवारी 23 मे रोजी आरक्षण झाले. यात 100हून अधिक प्रवासी ‘वेटिंग’वर आहेत, अशी नाराजी प्रवाशी बळीराम राणे यांनी व्यक्त केली.

Comments are closed.