दिल्ली विधानसभेला बॉम्बस्फोटाची धमकी
नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेला मंगळवारी बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना हा धमकीचा ईमेल मिळाला. यानंतर सभागृहाचे कामकाज रोखण्यात आले आणि परिसरात तपासणी करण्यात आली. याचबरोबर दिल्लीतील मेट्रोस्थानकालाही बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली. पोलिसांच्या तपासणीत काहीच संशयास्पद आढळून आले नसल्याचे समजते.
Comments are closed.