34 वर्षापूर्वीच्या या फिल्मने ए. आर. रहमान यांच्या करिअरला दिली नवी झेप, तर आजही यातील गाणी आहेत सुपरहिट – Tezzbuzz

भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बॉलीवूड सिनेमा प्रसिद्ध आहेतच मात्र यामागील एक गोष्ट म्हणजे त्यामधील गाणी. कोणत्याही चित्रपटामध्ये गाणे जर हिट असतील तर तो चित्रपट अजून जास्त चालतो. तर चित्रपटांची शोभा अधिक करून कथेने वाढतेच मात्र गाण्यांनी आतापर्यंत बॉलीवूड सिनेमांना एक उच्च दर्जाचे स्थान निर्माण करून दिले आहे. तर अशाच एक चित्रपटांची ओळख करून देणारा आहोत. जो अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जी गाणी आजही लोकांची आवडीची आहेत. तसेच ए. आर. रहमान यांच्या कार्यकर्तेस या गाण्यांमुळे सुरुवात झाली होती.

उत्तम गाणी असलेला चित्रपट म्हणजे ‘रोजा’. हा चित्रपट 1992 साली आला होता. मणिरत्नम यांनी हा चित्रपट दिग्दर्शीत केला होता. तर या चित्रपटात मधू (Madhu)आणि अरविंद स्वामी यांची प्रमुख भूमिका होती. तर या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. देशभक्तीसोबतच, या चित्रपटाने पती-पत्नीमधील प्रेम सुंदरपणे चित्रित केले. कथेसोबतच, चित्रपटातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात एकूण पाच गाणी होती.

मणिरत्नम यांच्या १९९२ सालच्या ‘रोजा’ चित्रपटात ए. आर. रहमान यांनी ती सर्व गाणी संगीतबद्ध केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर, या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारासह 11 मोठे पुरस्कार जिंकले होते. रोजा या चित्रपटात ‘भारत हमको जान से प्यारा है’, ‘रोजा जानेमन’, ‘ये हसीन वादियां’, ‘दिल है छोटा सा’ आणि ‘रुक्मिणी रुक्मिणी’ यांसारख्या गाण्यांचा समावेश होता. जी रहमान यांनी गायली होती. तर या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.1 चे रेटिंग आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

तू इतकी मोठी अभिनेत्री नाहीस, म्हणून यामी गौतमीला डिझायनरने नाकारला होता लेहेंगा, आईची साडी नेसून आदित्यची दुल्हन बनली हि अभिनेत्री

Comments are closed.