2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?

आर्यमन बिर्ला आरसीबी आयपीएल 2026: आयपीएलमधील (IPL 2026) रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) नवीन मालक मिळाले आहे. गतविजेत्या आरसीबीला आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आणि बोल्ट वेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांनी विकत घेतलं आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक आर्यमन विक्रम बिर्ला (Aryaman Birla) हे आरसीबी फ्रँचायझीचे अध्यक्ष असतील, तर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सत्यन गजवानी उपाध्यक्ष असतील. दरम्यान, आरसीबीला खरेदी केल्यानंतर आता सोशल मीडियावर आर्यमन विक्रम बिर्ला यांच्या नावाची सध्या चर्चा रंगली आहे.

आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन इन्व्हेस्टमेंट कंपनी यांनी संयुक्तपणे आरसीबी फ्रँचायझी 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत घेतली आहे. या करारानुसार, नवीन ग्रुप आरसीबीच्या पुरुष आणि महिला संघांचाही मालक असेल. आजपर्यंत, आरसीबी संघाने आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये मिळून दोन ट्रॉफी जिंकल्या आहेत. महिला संघाने 2024 मध्ये विमेन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. 2025 मध्ये, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळूर संघाने आयपीएल ट्रॉफी उंचावली.

कोण आहेत आर्यमन बिर्ला? (Who Is Aryaman Birla)

आर्यमन बिर्ला 2018 च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून मैदानात उतरले होते. मात्र काही कारणास्तव देशांतर्गत क्रिकेट व आयपीएल खेळल्यानंतर 22 व्या वर्षी आर्यमन बिर्ला यांनी  क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता 2026 मध्ये आर्यमन बिर्ला रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा मालक झाले आहे. आर्यमन बिर्ला सध्या Aditya Birla Group मधील विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

आरसीबी आयपीएलमधील एक प्रसिद्ध संघ- (RCB IPL 2026)

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु हा आयपीएलमधील एक प्रसिद्ध क्रिकेट संघ आहे. या संघाची स्थापना 2008 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय बंगळुरु येथे आहे. RCB संघात अनेक नामांकित खेळाडू खेळले आहेत, ज्यामध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचा समावेश होतो. आरसीबी संघ त्यांच्या आक्रमक खेळासाठी आणि मोठ्या फॅन फॉलोइंगसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या गेल्या हंगामातचं आरसीबीने पहिलं जेतेपद जिंकले.

आयपीएल 2026 साठी आरसीबीचा संपूर्ण संघ- (IPL 2026 RCB Full Squad)

रजत पाटीदार (कर्ंधर), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक शर्मा, वेंकट शर्मा, वेंकट शर्मा, रसिक शर्मा, रजत पाटीदार. जेकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान.

संबंधित बातमी:

RCB : राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?

आणखी वाचा

Comments are closed.