खरात प्रकरणी योग्य कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील – हर्षवर्धन सपकाळ.

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोंदूबाबा अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत, अशी माहिती मिळत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ X वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हणतात की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही या भोंदू सोबतचे फोटो समोर आले आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते, त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळत आहे. भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. पण त्यांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे अशोक खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कारवाई केली नव्हती, पण त्यांच्या मित्रपक्षातील सहका-यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई केली. भोंदू बाबा अशोक खरातच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आता मित्रपक्ष आणि स्वतःच्या पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Comments are closed.